घरराजकारणLok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची 8वी यादी जाहीर,...

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची 8वी यादी जाहीर, हंसराज हंस यांच्यासह या नेत्यांना मिळाली संधी

Lok Sabha Election 2024 :

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये ओडिशा, पंजाब आणि पश्चिम बंगालमधील लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार दिनेश सिंह यांना गुरुदासपूरमधून, तरनजीत सिंग संधू अमृतसरमधून, सुशील कुमार रिंकू जालंधरमधून, हंसराज हंस फरीदकोटमधून आणि प्रनीत कौर पतियाळामधून निवडणूक लढवणार आहेत.

यावेळी लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात होणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे.

भाजपच्या आठव्या यादीत ओडिशातील 3 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये जाजपूर येथील रवींद्र नारायण बेहरा, कंधमाल येथील सुकांत कुमार पाणिग्रही आणि कटक येथील भर्त्रीहरी महताब यांचा समावेश आहे. पंजाबमधून 6 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

याशिवाय पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 2 जागांवर भाजपचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. प्रणत तुडू झारग्राममधून तर, देबाशीष धर (IPS) बीरभूममधून निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी 2 उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली होती. यात अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांना पक्षाने तिकीट दिले. विद्यमान खासदार ए नारायणस्वामी यांच्या जागी माजी उपमुख्यमंत्री गोविंद करजोल यांना कर्नाटकच्या चित्रदुर्गातून तिकीट देण्यात आले. राणा यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक अमरावतीमधून अपक्ष म्हणून जिंकली होती. या निवडणुकीत त्यांनी शिवसेना (शिंदे गट) नेते अनंतराव अडसूळ यांचा पराभव केला होता.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Swaraj Fugare
Swaraj Fugarehttps://sanvaddrushti.in
My name is Swaraj Fugare. I am Owner, CEO And Founder of Sanvaddrushti News. I am 16 year old and 11th standard. i live in kondharki tal: pandharpur, District : Solapur
लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा