घरमहाराष्ट्रLok Sabha Election 2024 : मराठा समाजाकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण...

Lok Sabha Election 2024 : मराठा समाजाकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण सुरू; प्रश्नावली आली समोर

Lok Sabha Election 2024 :

सगेसोयरे अध्यादेश जारी करून मराठा सामाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या भूमिकेवर ठाम असलेल्या मराठा समजाकडून काल आंतरवाली सराटी गावामध्ये आरक्षणाची पुढील भूमिका ठरवण्यासाठी लाखो मराठा समाजाच्या उपस्तितीत बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाकडून राज्यात लोकसभा निवडणुकीत एकच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

त्याचबरोबर हा निर्णय घेताना गावागावत बैठक घेऊन इतर पक्षाचे ज्याप्रमाणे सर्वेक्षण करण्यात आले त्याचप्रमाणे 30 मार्चपर्यंत मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 30 मार्चनंतर मराठा सामज लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेणार आहेत.

काल झालेल्या बैठकीनंतर मराठा समाजाकडून गावागावात सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाचा फॉर्म आता साम टीव्हीच्या हाती लागला असून या सर्वेक्षण दरम्यान आठ प्रश्न करण्यात आलेत. त्यानंतर मराठा सामाज कोण कोणत्या मतदार संघातून आपले उमेदवार उभे करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नेमक कसा आहे हा सर्वेक्षण फॉम:

1. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात यावे का?….होय/नाही

अभिप्राय…………….

2. मराठा समाजानी येणारी लोकसभा निवडणूक लढवावी का.?….होय/ नाही

अभिप्राय………..

3. लोकसभा निवडणूक प्रत्येक जिल्हातून एक अपक्ष उमेदवार ‌द्यावा का.?….होय/ नाही

अभिप्राय……..

4. प्रत्येक गावातून दोन उमेदवार योग्य का?….होय/नाही

अभिप्राय………

5. कोणत्याही राजकीय एका पक्षाला आपण पाठिबा देणे योग्य का.?…होय/नाही

अभिप्राय…….

6. आपल्या कटुंब मतदान संख्या किती ?…. सख्या,

7. आरक्षण प्रश्न मार्गी लावणारा कोणत्याही जाती धर्माचा उमेदवार चालणार का.?…होय/नाही किंवा फक्त मराठा

अभिप्राय,…..

8. जिल्हातून लोकसभा मराठा समाजच्या निश्चित उमेदवार यांना तुम्ही मतदान करणार का? याचा अभिप्राय काय होईल? होय किंवा नाही? हे आठ प्रमुख प्रश्न प्रदर्शित केलेले आहेत आणि त्यांचा विचार केला जातो.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा