घरजालनाManoj Jarange Patil : आज अंतरवाली सराटीत मराठा समाजाची महाबैठक; काय असणार...

Manoj Jarange Patil : आज अंतरवाली सराटीत मराठा समाजाची महाबैठक; काय असणार मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा?

Maratha Aarkshan Manoj Jarange Patil Sabha :

अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आज राज्यातील मराठा समाजाची महाबैठक पार पडणार आहे. आजच्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. पोलिसांकडून या महाबैठकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान राज्य सरकारच्या वतीने दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला. मात्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करत मराठा समाजाच्या वतीने सगेसोयऱ्याची अंमलाबजावणी करुन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावं, ही मागणी त्यांनी लावून धरली आहे.

याच परिस्थितीमध्ये राज्यात लोकसभा निवडणूकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. त्यामुळे राज्यामध्ये आचार संहिता लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची व लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका ठरवण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये आज महाबैठक आयोजित करण्यात आली आहे.

सकाळी दहा वाजता या महाबैठकीच्या माध्यमातून निर्णय घेण्यात येणार आहे. या महाबैठकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन स्थळी मंडप लावून जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा कार्यकर्ते दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून दक्षतेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बॅरिकेट तैनात करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. जवळ पास तीन जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक पोलिस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे. आज या महाबैठकीतून

मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा