घरगुन्हाMangalwedha Crime News : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्याच प्रवृत्ती केले...

Mangalwedha Crime News : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्याच प्रवृत्ती केले प्रकरणी सासरा व सासूचा जामीन नामंजूर…

Mangalwedha Crime News :

दिनांक ०८/१२/२०२३ रोजी सकाळी सव्वानऊ वाजेच्या दरम्यान आरोपी सासू अलका सिद्धेश्वर मोरे, ननंद सोनाली सतीश जाधव, नवरा अण्णासाहेब मोरे सासरा सिद्धेश्वर मोरे सर्व राहणार ढवळस तालुका मंगळवेढा यांचे त्रासाला कंटाळून मयत काजल मोरे आत्महत्या केली प्रकरणी सुरेश मुरलीधर घाडगे यांनी मंगळवेढा पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान सहिता कलम ४९८अ ३०६,३२३,३०४ ब,५०४,५०६ सह ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. सदर प्रकरणी गुन्ह्यातील आरोपी यांना अटक करण्यात आलेली होती. सदर आरोपींपैकी अलका सिद्धेश्वर मोरे, व सिद्धेश्वर मारुती मोरे यांनी पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय यांचेकडे रेगुलर जामीन अर्ज दाखल केले होते.

त्यानुसार सदर अर्जाचे कामी पंढरपूर येथील मे. सत्र न्यायाधीश श्री तोष्णीवाल साहेब यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सदरचे दोन्ही अर्ज २१/०३/२०२४ रोजी नामंजूर केले.सरकारी पक्षातर्फे श्री. गोरे व मूळ फिर्यादी तर्फे श्री. ॲड.सिद्धेश्वर चव्हाण पंढरपूर यांनी कामकाज पाहिले.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा