घरनवी दिल्लीArvind Kejriwal Arrested : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध, आप कार्यकर्ते रस्त्यावर;...

Arvind Kejriwal Arrested : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध, आप कार्यकर्ते रस्त्यावर; राज्यभर भाजपविरोधात आंदोलने

Arvind Kejriwal Arrested :

कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी आम आदमी पक्षाचे प्रमुख, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीने अटक केली आहे. या अटकेनंतर सरकारकडून हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप इंडिया आघाडीकडून केला जात आहे. तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आपचे नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले असून राज्यात विविध ठिकाणी भाजपविरोधात आंदोलने सुरू केली आहेत.

पुण्यात आप कार्यकर्त्यांचे आंदोलन

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटकेच्या विरोधात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन सुरू आहे. पुण्यातील भाजपच्या शहर कार्यालयासमोर आपकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी आमच्या कार्यकर्त्यांकडून भाजपचे विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान आपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

सोलापूरमध्येही आप कार्यकर्ते आक्रमक

पुण्याप्रमाणेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात सोलापूरमध्येही आपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायले. सोलापूर जिल्हा परिषद गेट ते भाजप कार्यालयापर्यंत आप कार्यकर्ते मोर्चा काढणार आहेत. आपच्या या आंदोनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस ही रस्त्यावर उतरले असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

विरोधकांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून निषेध करण्यात ये असून केंद्र सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही केंद्र सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा