घरपंढरपूरPandharpur News : मराठा तरूण आक्रमक; प्रणिती शिंदेंसमोरच 'एक मराठा, लाख मराठा'...

Pandharpur News : मराठा तरूण आक्रमक; प्रणिती शिंदेंसमोरच ‘एक मराठा, लाख मराठा’ घोषणा, रोषामुळं गावातून माघारी फिरल्या

Pandharpur News :

भाजपला गाव बंदी नाहीतर घर बंदी करा असे आवाहन काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी मराठा समाजाला केले. आमदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात (Pandharpur Vidhansabha) गाव भेटी दौरा सुरू केला आहे. काही गावात मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावरून त्यांना गावा येण्यास विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार शिंदेंनी ज्यांनी तुम्हांला फसविले त्यांना गाव नव्हे तर घर बंदी करा पवित्रा घेत मराठा समाजाला आवाहन केले.

आमदार प्रणिती शिंदे यांच्या दौऱ्या दरम्यान आज (बुधवार) पंढरपूर तालुक्यातील कौठाळी गावात मराठा युवकांनी आरक्षणाच्या मागणीवरून आमदार शिंदे यांच्यासमोर गोंधळ घातला. कौठाळी गावामध्ये आमदार शिंदे या गेले असता तेथील मराठा समाजातील युवकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यास प्रारंभ केला. मराठा समाजाच्या युवकांचा रोष पाहता आमदार प्रणिती शिंदे यांनी गावातून बाहेर पडणे पसंत केले.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या खरतर विरोध भाजपचा झाला पाहिजे. त्यांनी एक दिवसाचे अधिवेशन घेऊन खेळी केली आहे. उघडं पाडण्याची वेळ आली आहे. भाजप पुन्हा खोटे नाटे सांगून लोकांची दिशाभूल करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनाही गाव बंदी केली पाहिजे, घरबंदी केली पाहिजे असे त्यांनी नमूद केले.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा