घरराजकारणMaharashtra Lok Sabha : सभेला उत्तर सभेने! महाविकास आघाडी एकजुटीने मैदानात; आज...

Maharashtra Lok Sabha : सभेला उत्तर सभेने! महाविकास आघाडी एकजुटीने मैदानात; आज पुण्यात जाहीर सभा

Maharashtra Lok Sabha :

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. २९) पुण्यात जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. या टीकेला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आज पुण्यात जाहीर सभा घेणार आहे.

पुण्यातील वारजे येथील आर. एम. डी. कॉलेजच्या मैदानात सायंकाळी ५ वाजता सभेला सुरुवात होईल. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

या सभेसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

“महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झालाय. या आत्मा स्वत:चं काम पूर्ण झालं नाही तर इतरांचं देखील काम बिघडवतात”, अशी टीका नरेंद्र मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर केली होती. तर “छत्रपती शिवरायांच्या भूमीत जे औरंगजेबाला मानतात अशा लोकांशी उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी केली आहे”.

“नकली शिवसेना या सगळ्या अजेंड्यात काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून चालते आहे. बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा तळतळत असेल. जे काही कारनामे चालले आहेत, ते पाहून त्यांच्या आत्म्याला यातना होत असतील”, असं म्हणत मोदींनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

याशिवाय मोदींनी राहुल गांधींच्या ‘गरीबी कशी हटवणार खटाखट-खटाखट’ या शब्दांवर देखील जोरदार टीका केली होती. दरम्यान, मोदींच्या या टीकेला महाविकास आघाडीचे नेते कसे प्रत्युत्तर देतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा