घरमहाराष्ट्रAhmednagar Lok Sabha: शरद पवार गटाविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; नेमकं कारण...

Ahmednagar Lok Sabha: शरद पवार गटाविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; नेमकं कारण काय?

Ahmednagar Nilesh Lanke Vs Sujay Vikhe :

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारसभेचं एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं. या पोस्टरवर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि माजी आमदार स्वर्गीय राजीव राजळे याचा फोटो छापण्यात आला आहे. यावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आचारसंहितेचा भंग केला जात असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात भाजपचे पदाधिकारी विष्णुपंत अकोलकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली लेखी तक्रार दिली आहे. यामुळे अहमदनगरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळत आहे.

भाजपने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ काबिज करण्यासाठी सध्या दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असून एकमेकांविरोधात टीकेचा भडीमार केला जातोय. अशातच निलेश लंके यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय राजीव राजळे फोटो असलेलं बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झालं.

याविरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता निवडणूक आयोग काय कारवाई करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आज शरद पवार शेगाव येथे जाहीर सभा घेणार आहेत.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा