घरराष्ट्रीयMP High Court News : 'चांगल्या घरातील मुलगा आहे' पोक्सोतील आरोपीला हायकोर्टाकडून...

MP High Court News : ‘चांगल्या घरातील मुलगा आहे’ पोक्सोतील आरोपीला हायकोर्टाकडून एका अटीवर जामीन; रुग्णालयात सेवा करण्याची शिक्षा

MP High Court News :

अल्पवयीन मुलीला अश्लिल कॉल करुन वारंवार त्रास दिल्याप्रकरणी अटक असलेल्या आरोपीला मध्यप्रदेश हायकोर्टाने जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे हा जामीन देताना न्यायालयाने ‘मुलगा चांगल्या घरातील आहे’, त्याला सुधारण्याची एक संधी दिली पाहिजे, अशी महत्वपूर्ण टिप्पणी केली. तसेच आरोपीला दोन महिने भोपालच्या रुग्णालयात सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे.

एकीकडे पुण्यातील पोर्शे अपघातात निबंध लिहण्याची शिक्षा दिल्यानंतर मध्यप्रदेशातील एक नवे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद असलेल्या एका आरोपीला मध्यप्रदेश हायकोर्टाने मुलगा चांगल्या घरातील असल्याची टिप्पणी करत जामीन मंजूर केला. तसेच कोर्टाने त्याला दोन महिने भोपाळच्या रुग्णालयात सेवा करण्याची शिक्षाही सुनावली.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मध्यप्रदेशातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या या आरोपी तरुणावर अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणे, तिला अश्लिल व्हिडिओ कॉल करणे तसेच वारंवार त्रास दिल्याचे गंभीर आरोप लावण्यात आले होते. ४ एप्रिल रोजी त्याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी मध्यप्रदेशच्या उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

या सुनवाणीदरम्यान कोर्टाने मुलाच्या घरची पार्श्वभूमी विचारात घेता त्याला एक संधी मिळावी, अशी महत्वपूर्ण टिप्पणी केली. या सुनावणीत न्यायमूर्ती आनंद पाठक यांनी पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीवर लावलेले आरोप खुपच गंभीर स्वरुपाचे आहेत. बीबीएच्या विद्यार्थ्याकडून अशी अपेक्षा नाही. मात्र तो चांगल्या कुटुंबातील आहे, त्याला एक सुधारण्याची संधी द्यायला हवी, असे नमुद केले आहे.

तसेच आरोपी विद्यार्थ्याला भोपाळ जिल्हा रुग्णालयात दर शनिवार आणि रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत फक्त डॉक्टर आणि कंपाउंडर्सना मदत करण्यास सांगितले आहे. मात्र, त्यासाठी काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये रुग्णाला औषधे, इंजेक्शन आदी न देणे, त्याला खासगी वॉर्डात जाऊ न देणे आदी बाबींचा समावेश आहे.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा