घरराजकारणNashik Loksabha Election : नाशिकवरुन महायुतीत कलह संपेना! भाजप पुन्हा आक्रमक; पदाधिकारी...

Nashik Loksabha Election : नाशिकवरुन महायुतीत कलह संपेना! भाजप पुन्हा आक्रमक; पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामा

Nashik Loksabha Constituency News :

नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीमधील वाद काही मिटत नसल्याची चिन्हे दिसत आहे. सध्या शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही या जागेवर ठाम आहेत. त्यामुळेच महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये वाद पाहायला मिळत असून आता भाजप कार्यकर्त्यांनी थेट राजीनाम्याचे अस्त्र उचलले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे नाशिक लोकसभेची पुन्हा उमेदवारी मिळवण्यावर ठाम आहेत. चार दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईमध्ये मोठे शक्तीप्रदर्शनही केले होते. मात्र साताऱ्याची जागा भाजपला सोडल्यानंतर ही जागा छगन भुजबळ यांनी लढवावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. अशातच हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांच्या नावाला विरोध करत भाजप नेत्यांनीही या जागेवर दावा केला आहे.

नाशिक लोकसभेसाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र उचलले आहे. त्यानुसार नाशिक लोकसभा मतदारसंघातील २० पैकी १० ते १२ मंडल अध्यक्ष सामूहिक राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीमधील तणाव वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे नाशिकच्या जागेवर पुन्हा लढवण्यास ठाम आहेत. यासाठी हेमंत गोडसे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी हेमंत गोडसे यांच्यासोबत मंत्री दादा भुसे, सुहास कांदे आणि शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरीही होते. या भेटीनंतर हेमंत गोडसे यांनी १०० टक्के जागा मलाच मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा