घरराजकारणMaharashtra Lok Sabha : जरांगे पाटलांनी मागवला गावागावातून अहवाल; लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठा...

Maharashtra Lok Sabha : जरांगे पाटलांनी मागवला गावागावातून अहवाल; लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra Lok Sabha Election :

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणुक लढणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आंदोलनकाळापासून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंनी निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. दरम्यान आज जरांगे यांनी, राजकारण आपला विषय नाही, मात्र समाजाची इच्छा आहे म्हणून लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. उद्या गावागावातून येणाऱ्या अहवाला बाबत निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्यांच ते म्हणाले आहेत. मराठ्याच्या उमेदवारीचा कोणाला फायदा होतो आणि कुणाला तोटा होतो हे सगळं उद्या क्लियर होईल. मायबाप समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

काही तरुण सोशल मीडियावर स्वयंघोषित उमेदवारीचा निर्णय घेत आहेत. या त्या तरुणांच्या भावना आहेत. त्यांना सरकार विषयी चीड आहे. सरकारने त्यांची फसवणूक केली म्हणून हे तरुण राजकारणात पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र समाज ठरवेल तो अंतिम निर्णय राहील. गावागावातून आलेल्या अहवालानंतर अंतिम निर्णय होईल आणि तोच निर्णय सर्वांना लागू असेल.

काहीजण उमेदवाराच्या नावाखाली वर्गणी जमा करत आहेत. त्याची अजिबात गरज नाही, निवडणुकी एक रुपयाही लागणार नाहीये, त्यामुळे असली दुकानं कोणीही सुरू करू नयेत. त्यांनी असं केलं असेल तर त्यांनी ते परत करावं नाहीत मीडियासमोर वाजवल्या शिवाय राहणार नाही असा सज्जड दम वर्गणी जमा करणाऱ्या कार्यकर्त्यांना जरांगेंनी दिला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीदरम्यान झालेल्या हाणामारीच्या घटनेवर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, तिथे काय झालं हे मला माहित नाही. मी पाहिलंही नाही, मात्र दोघांना या ठिकाणी बोलावून त्यांच्यात समेट घालण्याचा प्रयत्न करणार आहे. मोठं कुटुंब म्हटलं की असे वाद होतातच. काहीजणांकडून आंदोलनात फूट पाडण्यासाठी हे कृत्य झाल्याचं बोलल्या जात आहे, त्यावर बोलताना जरांगे पाटील यांनी, समाजात आता फूट पडू शकत नाही 70 टक्के समाज हा एकत्र आला आहे. त्यामुळे इतकी मोठी लाट निर्माण झाली आहे. काहींना झोप येते आपण खासदार झाल्यासारखं वाटतंय त्यांना मी उद्या प्लॅन दिला तर कळेल निवडणुकीपेक्षा साथ महत्त्वाची आहे, असा टोलाही त्यांनी संभाजीनगर येथे झालेल्या वादावरून वाद निर्माण करणाऱ्याना लगावला आहे.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा