घरराजकारणChhagan Bhujbal : उमेदवारी आधीच भुजबळांना नाशिकमधून जोरदार विरोध, सकल मराठा समाजाकडून...

Chhagan Bhujbal : उमेदवारी आधीच भुजबळांना नाशिकमधून जोरदार विरोध, सकल मराठा समाजाकडून पोस्टरबाजी

Chhagan Bhujbal :

नाशिक लोकसभा मतदारसंघावरून (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. त्यातच नाशिक लोकसभेची उमेदवारी मंत्री छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) मिळणार, असे संकेत मिळत आहेत. मात्र यामुळे मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

गुरुवारी नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची (Sakal Maratha Samaj) बैठक पार पडली होती. या बैठकीत छगन भुजबळांविरोधात नाराजीचा सूर उमटल्याचे दिसून आले. छगन भुजबळांच्या विरोधात लोकसभेत मराठा उमेदवार द्या, मराठ्यांच्या मुलांचा तोंडचा घास पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या छगन भुजबळांना गाडण्यासाठी उमेदवार द्यायचा, अशी भूमिका सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती.

भुजबळांच्या चेहऱ्यावर काठ मारलेले पोस्टर व्हायरल 

आता उमेदवारी आधीच छगन भुजबळ यांना मतदारसंघातून विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर छगन भुजबळ यांच्या विरोधात पोस्ट व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करणाऱ्या भुजबळ यांना मतदान न करण्याचे आवाहन करण्याऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. भुजबळ यांच्या चेहऱ्यावर काठ मारलेले पोस्टर सोशल मिडियावर (Social Media) टाकण्यात आले आहे.

भुजबळांच्या विरोधात मराठा समाज एकवटला

तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील (Nashik Lok Sabha Constituency) अनेक गावांमध्ये भुजबळ यांच्या विरोधात होर्डिंग्ज देखील लावण्यात आले आहेत. भुजबळांची नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच मराठा समाजाचा विरोध वाढला आहे. भुजबळांच्या विरोधात मराठा समाज एकवटल्याचे दिसून येत आहे. आता छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) नाशिकमधून अधिकृत उमेदवारी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नाशिकमध्ये मराठा समाज देणार उमेदवार

दरम्यान, एकीकडे छगन भुजबळ नाशिक लोकसभा लढवण्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे सकल मराठा समाज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मराठा समाजाकडून नाशिकसाठी उमेदवाराची चाचपणी केली जात असून नाशकात झालेल्या बैठकीचा अहवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना पाठवण्यात येणार आहे.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा