घरराजकारणSharad Pawar In Satara : अजित पवार गटातील नेता शरद पवारांच्या भेटीला;...

Sharad Pawar In Satara : अजित पवार गटातील नेता शरद पवारांच्या भेटीला; निवडणुकीआधी साताऱ्यातील राजकीय समीकरणं बदलणार?

Sharad Pawar In Satara :

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (sharad pawar) हे आज (शुक्रवार) सातारा दाै-यावर आले आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत पवार यांची बैठक सुरु आहे. या बैठकीपूर्वी पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) गटाचे नेते माजी आमदार प्रभाकर घार्गे (prabhakar gharge) यांची चर्चा झाली. या चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने पवार यांची पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी महत्त्वाची चर्चा सुरु आहे. भविष्यात सातारा लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती काय असेल याच्यावर देखील चर्चा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील यांच्यापेक्षा आमदार बाळासाहेब पाटील (mla balasaheb patil) यांना उमेदवारी मिळावी यासाठी बहुतांश कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. काही कार्यकर्त्यांनी खूद्द खासदार शरद पवार यांनीच निवडणूक लढवावी असा आग्रह आजही धरला आहे.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Swaraj Fugare
Swaraj Fugarehttps://sanvaddrushti.in
My name is Swaraj Fugare. I am Owner, CEO And Founder of Sanvaddrushti News. I am 16 year old and 11th standard. i live in kondharki tal: pandharpur, District : Solapur
लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा