घरराजकारणFight in Meeting : मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी; उमेदवारांकडून पैसै घेतल्याचा...

Fight in Meeting : मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी; उमेदवारांकडून पैसै घेतल्याचा आरोप

Sambhajinagar Fight in Meeting Video :

लोकसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना, छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा समाजाच्या बैठकीत दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. उमेदवारांकडून पैसे घेतल्याच्या आरोपातून ही हाणामारी झाल्याचं कळतंय. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मराठा बांधवांची (Maratha Community) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोठा गोंधळ झाल्याचे समोर आलं आहे. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. याच बैठकीत महिला कार्यकर्त्या देखील उपस्थिती होत्या. बैठक सुरु असतानाच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. काही जण दुसऱ्या उमेदवाराकडून पैसे घेऊन आल्याचा आरोप करत या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाली.

नेमकं काय घडलं?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर शहरातील मराठा मंगल कार्यालयात मराठा समाजाच्या बांधवांकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले.

काही कार्यकर्त्यांनी काही लोक येथे उमेदवारांकडून पैसे घेऊन आले आहेत, असा आरोप करत समाज बांधवांची एकमेकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर या बैठकीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. या गोंधळामुळे ही बैठक स्थगिक करण्यात आली. या हाणामारीनंतर घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा पोहोचला. पोलिसांनी घटनास्थळी शांतता प्रस्थापित केली.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Swaraj Fugare
Swaraj Fugarehttps://sanvaddrushti.in
My name is Swaraj Fugare. I am Owner, CEO And Founder of Sanvaddrushti News. I am 16 year old and 11th standard. i live in kondharki tal: pandharpur, District : Solapur
लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा