घरराजकारणKareena Kapoor Karishma Kapoor : करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही...

Kareena Kapoor Karishma Kapoor : करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण

Kareena Kapoor Karishma Kapoor :

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे, ज्यामध्ये विविध राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग-आउटगोईंग सुरू झाले आहे; आज अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा (Govinda) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknanth Shinde) यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहे, तर, दुसरीकडे अभिनेत्री करिष्मा कपूर (Karishma Kapoor) आणि करिना कपूरदेखील (Kareena Kapoor) वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे; मागील काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा हा राजकारणात पुन्हा प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, त्यानंतर आज गोविंदा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे, मुंबईतील (Mumbai Lok Sabha Election) उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी (North West Lok Sabha Constituency) गोविदांचं नाव चर्चेत आहे, त्यामुळे या मतदारसंघातून त्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, उत्तर पश्चिम मतदार संघातून महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे, त्यामुळे गोविंदाला उमेदवारी दिल्यास अमोल किर्तीकर विरोधात त्याची लढत होईल; अभिनेत्री करिष्मा कपूर आणि अभिनेत्री करिना कपूर या दोन अभिनेत्रीदेखील वर्षा बंगल्यावर दाखल झाल्या आहेत, या दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर गोविंदाच्या पक्ष प्रवेशाआधीच दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे, तर, दुसरीकडे या दोन्ही अभिनेत्री राजकारणात प्रवेशासाठी आल्या की काही कामानिमित्त आल्यात याचीदेखील चर्चा सुरू झाली आहे, कपूर कुटुंबीयांकडून या आधी राजकीय-सामाजिक मुद्यावर फार क्वचित भाष्य करण्यात आले आहे, राजकारणातही या कुटुंबातील कोणताही सदस्य आला नाही, त्यामुळे आता थेट अभिनेत्री करिष्मा कपूर आणि करिना कपूर-खान वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे।

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Swaraj Fugare
Swaraj Fugarehttps://sanvaddrushti.in
My name is Swaraj Fugare. I am Owner, CEO And Founder of Sanvaddrushti News. I am 16 year old and 11th standard. i live in kondharki tal: pandharpur, District : Solapur
लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा