घरमहाराष्ट्रMadha Lok Sabha 2024 : करमाळा मतदारसंघ बदलू शकतो माढ्याची गणितं; महाविकास...

Madha Lok Sabha 2024 : करमाळा मतदारसंघ बदलू शकतो माढ्याची गणितं; महाविकास आघाडीकडून नारायण पाटील यांच्या नावाची चर्चा

Madha Lok Sabha 2024 :

माढा लोकसभा मतदारसंघात अद्यापही महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. याबाबत नारायण पाटील यांना विचारणा देखील झाली आहे. त्यामुळे २०१९ ला आमदार संजय शिंदे यांनी आयत्यावेळी लोकसभा लढवून सर्वांनाच धक्का दिला होता. त्याचप्रमाणे याहीवेळी माढा लोकसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू करमाळा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाची गणिते करमाळा विधानसभा मतदारसंघ बदलू शकतो. अण्णा काळे माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. सध्या करमाळा तालुक्यातील आमदार संजय शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप व ज्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला, त्या रश्मी बागल या भाजपसोबत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेले माजी आमदार नारायण पाटील यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. सध्या आमदार पाटील यांच्या कार्यालयात तालुक्यातील गावोगावच्या कार्यकर्त्यांचे बैठका सत्र सुरू असून लवकरच नारायण पाटील हे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच महाविकास आघाडीकडून नारायण पाटील यांना लोकसभा लढविण्यासंदर्भात विचारणा करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

सध्या करमाळा तालुक्यात धैर्यशील मोहिते-पाटील त्यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते-पाटील यांचे दौरे सुरू आहेत. धैर्यशील मोहिते-पाटील देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत. तर मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्याबाबत चर्चा सुरू आहेत. त्यामुळे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उमेदवारी घ

राष्ट्रवादी : १०१९३२

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा