घरसोलापूरSolapur Lok Sabha 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघात रामराज्य येणार? सातपुतेंच्या विजयात...

Solapur Lok Sabha 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघात रामराज्य येणार? सातपुतेंच्या विजयात राहणार शिवसेनेचा निर्णायक वाटा

Solapur Lok Sabha 2024 :

सोलापूर शहर मध्य, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, मोहोळ यासह उर्वरित विधानसभा मतदारसंघात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मोठी ताकद आहे. मुख्यमंत्री म्हणून अल्पावधीतच त्यांनी जनहिताचे घेतलेले निर्णय, आरोग्य शिबिरे, रोजगार मेळावे, यामुळे जनता त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या विजयात शिवसेनेचा निश्चितपणे निर्णायक वाटा राहील, असा विश्वास जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात रामराज्य आणण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत. दरम्यान, माळशिरसमध्ये आमदार म्हणून काम करताना पाच वर्षांत राम सातपुते यांनी विविध विकासकामे करीत तेथील जनतेचा विश्वास संपादित केला आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा निवडणुकीत निश्चितपणे तगडे उमेदवार म्हणून सक्षमपणे निवडणूक लढवतील. सोलापुरातील उद्योगास चालना मिळेल, युवकांना काम मिळेल व त्यांचे स्थलांतर होणार नाही, यासाठी विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी काहीही काम केले नाही.

दहा कामगारसुद्धा त्यांच्यामुळे कामाला लागलेले नाहीत. अशांकडून विकासाची काय आशा करणार आणि त्यामुळेच जनता राम सातपुतेंकडे आशेने पाहत आहे. कामगारांच्या शहरात कामगाराचा मुलगा त्यांच्यासाठी निश्चितपणे काहीतरी करेल, असा त्यांना विश्वास आहे. त्यांच्या विजयासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख ते बूथ प्रमुखांपर्यंत सर्वजण प्रयत्न करतील, अशी ग्वाही देखील अमोल शिंदे यांनी दिली आहे.

शिवसेना संपर्क कार्यालयात उमेदवारासोबत बैठक

भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सोमवारपासून (ता. २५) प्रचाराला सुरवात केली आहे. मंगळवारी (ता. २६) सकाळी त्यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली. सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आमदार सातपुतेंनी यावेळी व्यक्त केली.

 

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा