घरराजकारणLok Sabha Election : ठाकरे गटाचे १७ शिलेदार आखाड्यात; उमेवारांची पहिली यादी...

Lok Sabha Election : ठाकरे गटाचे १७ शिलेदार आखाड्यात; उमेवारांची पहिली यादी जाहीर; कुणाला पुन्हा मिळाली संधी?

lok sabha Latest news :

ठाकरे गटाच्या गोटातून मोठी बातमी हाती आली आहे. ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीत १७ नावांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागावाटपावर अनेकांचं लक्ष लागलं होतं. काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून तिढा होता. यामुळे मागील दोन-तीन दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला होता. त्यानंतर आज बुधवारी सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली.

खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. ‘ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे, अशी पोस्ट करत राऊतांनी याविषयी माहिती दिली. ठाकरे गटाने पहिली यादी जाहीर केल्याने महाविकास आघाडीमधील जागावाटपांचा तिढा मिटला का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

लोकसभा उमेदवारांची यादी खालील प्रमाणे…

  1. बुलडाणा – नरेंद्र खेडेकर
  2. यवतमाळ-वाशिम- संजय देशमुख
  3. मावळ- संजोग वाघेरे पाटील
  4. सांगली- चंद्रहार पाटील
  5. हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
  6. संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
  7. धाराशीव – ओमराजे निंबाळकर
  8. शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे
  9. नाशिक – राजाभाऊ वाजे
  10. रायगड – अनंत गीते
  11. सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
  12. ठाणे – राजन विचारे
  13. मुंबई-ईशान्य- संजय दिना पाटील
  14. मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
  15. मुंबई वायव्य – अमोल कीर्तिकर
  16. परभणी- संजय जाधव
  17. दक्षिण मध्य – अनिल देसाई
जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा