घरराजकारणSolapur Lok Sabha 2024 : 'उमेदवार इथला असो की बाहेरचा...' प्रणिती शिंदेंच्या...

Solapur Lok Sabha 2024 : ‘उमेदवार इथला असो की बाहेरचा…’ प्रणिती शिंदेंच्या राम सातपुतेंना पत्रातून हटके शुभेच्छा

Solapur Lok Sabha Constituency :

भाजपने पाचव्या यादीत राज्यातील तीन उमेदवारींची घोषणा केली, ज्यामध्ये सोलापूरमधून राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्वीट करून आमदार राम सातपुते यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राम सातपुते यांचं सोलापूर लोकसभेसाठी भाजप उमेदवार म्हणून नाव घोषित झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “राम सातपुते जी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणुक रिंगणात स्वागत आहे! सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते, असं ट्वीट प्रणिती शिंदेंनी केलं आहे. “तसंच या उमेद्वारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळालीये त्या बद्दल शुभेच्छा देते. लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावं असं माझं मत आहे”, असं प्रणिती शिंदेंनी आपल्या पत्रात पुढे म्हटलं आहे. पुढील ४० दिवस याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते. सोल

ापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापूरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते, अशा शुभेच्छा प्रणिती शिंदेंनी दिल्या आहेत. प्रणिती शिंदे यांनी दिल्या शुभेच्छांचा आमदार राम सातपुते कशा पद्धतीने स्वीकार करतात, हे पाहणं महत्वाचं आहे, कारण ते निवडणूकीत उमेदवार म्हणून उच्च स्थानी आले आहेत आणि त्यांच्यावर देशातील समाजाची, लोकशाहीची, आणि राजकीय पक्षांची नजर असते, त्यामुळे त्यांना मिळालेल्या शुभेच्छांच्या निमित्ताने त्यांच्या कार्यात विशेष महत्व दिला जातो. सोलापुरात दोन्ही प्रमुख पक्षांकडून युवा उमेदवार दिल्याने निवडणुकीत रंगत येणार असल्याचं स्पष्ट होतंय.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Swaraj Fugare
Swaraj Fugarehttps://sanvaddrushti.in
My name is Swaraj Fugare. I am Owner, CEO And Founder of Sanvaddrushti News. I am 16 year old and 11th standard. i live in kondharki tal: pandharpur, District : Solapur
लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा