घरराजकारणNashik Lok Sabha 2024 : भाजप आणि शिंदे गटात वाद चिघळणार! नाशिक...

Nashik Lok Sabha 2024 : भाजप आणि शिंदे गटात वाद चिघळणार! नाशिक मतदारसंघासाठी..

Nashik Lok Sabha 2024 :

महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अद्याप एकोपा दिसत नाही. त्यामूळे नाशिक मतदारसंघ कोणाचा यावरील वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. भाजपचे (BJP) पदाधिकारी उद्या मतदारसंघ मिळावा म्हणून थेट मुंबईला धडकणार आहेत.

महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट (Ajit Pawar) या प्रत्येकाने नाशिक मतदारसंघावर आपला अधिकार सांगितला आहे. त्यात आता मनसेचे राज ठाकरे यांची देखील भर पडली आहे. मनसेलाही नाशिक मतदार संघ हवा आहे. त्यामुळे हा मतदारसंघ नेमका कोणाचा यावरून महायुतीमध्ये परस्पर कुरघोडीचे राजकारण सुरू आहे.

या संदर्भात भाजपचे नाशिक लोकसभा मतदारसंघप्रमुख केदा आहेर यांनी वरिष्ठ नेत्यांची काल चर्चा केली. महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत घटक पक्षाचे नेत्यांची दिल्लीत बैठक सुरू होती. काल यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर ती चर्चा झालेली आहे. त्यामुळे ते एक-दोन दिवसात राज्यातील नेते परस्परांच्या करून निर्णय घेतील. त्यामध्ये नाशिक मतदारसंघ भाजपलाच असावा यावर सगळ्यांचे एकमत आहे.

आहेर म्हणाले, “भाजपकडे अत्यंत प्रभावी इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी गेली दोन वर्ष या मतदारसंघात मोठे काम उभे केले आहे. भाजपने वर्षभरामध्ये बूथप्रमुखांपासून तर वरिष्ठ स्तरापर्यंत मोठी निवडणूक यंत्रणा निर्माण केली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळाला पाहिजे. तसे झाल्यास आमचा विजय शंभर टक्के निश्चित आहे. त्यामुळे आम्ही उद्या आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. नाशिकचे मतदारसंघ भाजपलाच मेळावा असा आमचा आग्रह आहे. त्यात आम्ही निश्चित यशस्वी होऊ असा विश्वास आम्हाला वाटतो.

नाशिक मतदारसंघासाठी भाजपकडे केदा आहेर, ‘मविप्र’ संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, पक्षाचे माजी सभागृहन

ेते दिनकर पाटील यांचं विविध इच्छुक आहेत नाशिकचे विद्यमान खासदार अकार्यक्षम असून त्यांनी मतदारसंघाचा अपेक्षित विकास केलेले नाही.

त्यामुळे या मतदारसंघाला न्याय देण्यासाठी फक्त भाजपच योग्य ठरू शकतो. असा या इच्छुकांचा दावा आहे. यातील काही इच्छुक सातत्याने सहकारी पक्षाचे खासदार व उमेदवारीचे दावेदार नंतर गोडसे यांच्यावर टीका करीत असतात. त्यामुळे महायुतीत नाशिकच्या जागेवरून मोठा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Swaraj Fugare
Swaraj Fugarehttps://sanvaddrushti.in
My name is Swaraj Fugare. I am Owner, CEO And Founder of Sanvaddrushti News. I am 16 year old and 11th standard. i live in kondharki tal: pandharpur, District : Solapur
लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा