घरराष्ट्रीयHimachal Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का; ६ बंडखोरांसहित ३...

Himachal Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का; ६ बंडखोरांसहित ३ अपक्ष आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

Himachal Politics Updates :

हिमाचल प्रदेशमध्ये सहा माजी आणि तिन अपक्ष आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगमुळे अपात्र ठरलेल्या सहा माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावरच हिमाचलमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सहा बंडखोर आमदार आणि तीन अपक्ष आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसचे आमदार सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो, इंदर दत्त लखनपाल आणि अपक्ष आमदार के एल ठाकूर, होशियार सिंह आणि आशिष शर्मा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विधानसभेच्या एकूण ६८ जागांपैकी काँग्रेसच्या आता ३४ जागा झाल्या आहेत. त्याच वेळी, भाजपची संख्या वाढणार नाही कारण सहा बंडखोर आमदारांना सभापतींनी निलंबित केलं आहे. तर तीन अपक्ष आमदारांनी राजीनामे दिले आहेत. या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विधानसभेच्या एकूण ६८ जागांपैकी काँग्रेसच्या आता ३४ जागा कमी झाल्या आहेत.

राज्यसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या या सहा बंडखोर आमदारांना हिमाचल प्रदेशचे सभापती कुलदीप सिंह पठानिया यांनी अपात्र ठरवलं होतं. ते म्हणाले होते की, पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत या सहा आमदारांविरुद्धची तक्रार आमदार आणि मंत्री हर्षवर्धन यांच्यामार्फत आमच्या सचिवालयाला प्राप्त झाली होती. त्यानंतर त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत निर्णय दिला होता. निलंबित आमदारांनी व्हिपचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट झालं होतं. २९ फेब्रुवारी रोजी त्यांना अपात्र ठरविण्यात आलं होतं.

हिमाचल प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे ४०

आमदार होते. ६८ सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा ३५ आहे. या सहा आमदारांच्या बंडखोरीनंतर विधानसभेतील काँग्रेस आमदारांची संख्या ४० वरून ३४ वर आली आहे. ती बहुमतासाठी आवश्यक असलेल्या संख्येपेक्षा एकने कमी आहे. परंतु, बंडखोर आमदारांना सदस्यत्वावरून अपात्र ठरवल्यानंतर आता विधानसभेचे संख्याबळ ६२ झाले आहे. अशा स्थितीत बहुमतासाठी आवश्यक असलेली संख्या आता ३२ झाले आहे.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Swaraj Fugare
Swaraj Fugarehttps://sanvaddrushti.in
My name is Swaraj Fugare. I am Owner, CEO And Founder of Sanvaddrushti News. I am 16 year old and 11th standard. i live in kondharki tal: pandharpur, District : Solapur
लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा