घरनवी दिल्लीLok Sabha Election 2024 : काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी केव्हा जाहीर होणार?...

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी केव्हा जाहीर होणार? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

Lok Sabha Election 2024 :

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे, आणि काँग्रेसने उमेदवारांची काल रात्री तिसरी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा सामावेश होता. त्यानंतर राज्यात काँग्रेसकडून इतर लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळते, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याचदरम्यान, राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी आज शुक्रवारी सायंकाळी जाहीर होईल, अशी माहिती काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत यांनी माध्यमांशी संवाद साधला. बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘राज्यातील पहिली यादी काल आली. दुसरी यादी आज शुक्रवारी संध्याकाळी येईल. उर्वरित जागांबाबत ते निर्णय घेतील. तीन ते चार जागांचा विषय आहे. सांगलीबाबतची वस्तुस्थिती आम्ही दिल्लीला सांगितली आहे’. ‘मुंबईच्या तीन जागा मागितल्या आहेत. इच्छुक उमेदवारांची संख्या आमच्याकडे जास्त आहे,असे ते पुढे म्हणाले.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा