घरराजकारणLoksabha Election 2024 : महायुतीत जाण्यास मनसे नेते इच्छुक? राज ठाकरेंची शिंदे-...

Loksabha Election 2024 : महायुतीत जाण्यास मनसे नेते इच्छुक? राज ठाकरेंची शिंदे- फडणवीसांसोबत दीड तास खलबतं; भूमिकेकडे लक्ष!

Loksabha Election 2024 :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीमध्ये घेण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आज (गुरूवार, २१ मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरेंची बैठक झाली. तब्बल दिड तास चाललेल्या या बैठकीत युतीसंदर्भात महत्वाची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मनसे नेत्यांची शिवतिर्थावर बैठक!

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची (MNS) शिवतीर्थावर बैठक पार पडली. दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री, भाजप नेते अमित शहा यांची दिल्लीत भेट झाली होती. त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये बऱ्याच नेत्यांनी मनसेनं महायुतीसोबत आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात येत आहे.

राज ठाकरेंची शिंदे फडणवीसांसोबत खलबतं

त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वांद्रे येथील ताज लॅण्डसन हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत मनसे- भाजप युतीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या युतीबाबत येत्या दोन- ३ दिवसात निर्णय होईल, असेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अमित शहा यांनी राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीदरम्यान महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याटी अट ठेवली होती. परंतू मनसेकडून नकार देण्यात आल्याचे बोलले जात आहे. आजच्या भेटीनंतर राज ठाकरे यांची मनसे पदाधिकाऱ्यांसोबत पुन्हा बैठक होत आहे. या बैठकीत राज ठाकरे महायुतीबाबत काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा