घरमहाराष्ट्रRam Satpute News : प्रणिती शिंदेंची खोचक टीका, राम सातपुतेंचे 'जय श्रीराम'ने...

Ram Satpute News : प्रणिती शिंदेंची खोचक टीका, राम सातपुतेंचे ‘जय श्रीराम’ने प्रत्यूत्तर; सोलापुरात राजकारण तापलं!

Ram Satpute News Solapur Loksabha :

सोलापूर लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, आणि जेव्हा राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्र लिहित उमेदवार इथला असो किंवा बाहेरचा असा टोला लगावत राम सातपुते यांचे स्वागत केले होते, त्यांच्या या टीकेला आता राम सातपुते यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.

.@SHINDEPRANITI ताई, जय श्रीराम! आपण केलेल्या स्वागताबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..!

गेल्या ५ वर्षांत माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ज्या पद्धतीने मेहनत केली आहे त्याचं पध्दतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील!

माझ्याही आपणांस खूप खूप शुभेच्छा! PIC.TWITTER.COM/ZZ2TTTL2JH

— RAM SATPUTE (MODI KA PARIVAR) (@RAMVSATPUTE) MARCH 25, 2024

काय म्हणालेत राम सातपुते?

आ. प्रणिती शिंदेजी, जय श्रीराम…! मी २०१९ पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय. मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या, आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय.

मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्ष राजकारण केलंय, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखले आहे, असा टोला राम सातपुते यांनी लगावला.

तसेच राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटूंबात जन्मलेल्या माझसारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन; असेही, राम सातपुते यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Swaraj Fugare
Swaraj Fugarehttps://sanvaddrushti.in
My name is Swaraj Fugare. I am Owner, CEO And Founder of Sanvaddrushti News. I am 16 year old and 11th standard. i live in kondharki tal: pandharpur, District : Solapur
लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा