NCP Candidate List Sharad Pawar Group :
राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज (ता. ३० मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये वर्ध्यातून अमर काळे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून सुप्रिया सुळे, नगरमधून निलेश लंके, तसेच दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकींच्या पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये वर्ध्यात नुकतेच काँग्रेसमधून शरद पवार गटात आलेले अमर काळे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे, दिंडोरीमधून भास्करराव भगरे, तसेच नगर दक्षिणमधून कालच अजित पवार गटातून आलेले निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
“भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र लढण्याचा निर्धार केला पाहिजे. काही लोक जर वेगळे लढण्याचा विचार करत असेल तर समविचारी मतांमध्ये विभागणी होईल. त्यामुळे सर्वांनी एकसंधपणे लढलं पाहिजे,” असे आवाहनही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
या जागांवर तिढा?
दरम्यान, लोकसभेचे सातारा, माढा मतदार संघही शरद पवार यांच्या पक्षाकडे आहेत. मात्र या जागेवरील उमेदवार अद्याप घोषित करण्यात आलेले नाहीत. माढ्यातून धैर्यशिल मोहिते पाटील किंवा शेकापचे अनिकेत देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे तर साताऱ्यामधून बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.