घरगुन्हाNashik News : सराफा व्यापाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड; पैशांचा नुसता ढीग, नोटा...

Nashik News : सराफा व्यापाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड; पैशांचा नुसता ढीग, नोटा मोजण्यासाठी लागला १४ तासांचा वेळ

Nashik News :

राज्यातील बडे व्यावसायिक आणि सराफा व्यापारी सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आयकर विभागाचे अधिकारी राज्यात ठिकठिकाणी छापेमारी करीत आहेत. या छापेमारीत अनेकांकडे बेहिशीबी मालमत्ता सापडत आहेत.

नाशिकमध्ये शनिवारी आयकर विभागाने अचानक छापेमारी केली. या छापेमारीत एका बड्या सराफा व्यावसायिकाकडे कोट्यवधींचं घबाड आढळून आलं. सराफा व्यावसायिकाने बंगल्यातील फर्निचर तसेच प्लायवूडच्या आत कोट्यवधींची रक्कम लपवून ठेवली होती.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम बाहेर काढली. नोटांचा इतका मोठा ढीग लागला की, पैसे मोजण्यासाठी मशीन मागवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेली रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल १४ तासांचा कालावधी लागला. तसेच रोकड नेण्यासाठी ७ कार मागवण्यात आल्या होत्या.

या छापेमारीत आयकर विभागाने सराफा व्यापाऱ्याच्या बंगल्यातून एकूण २६ कोटींची रोकड आणि ९० कोटींची बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त केले. नाशिक, नागपूर आणि जळगावच्या पथकातील ५० अधिकाऱ्यांची एकाच वेळी ही कारवाई केली आहे.

सलग ३० तास सुरू असलेल्या या कारवाईमुळे शहरातील बड्या व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. सराफा व्यावसायिकाकडे कोट्यावधींची रोकड आणि बेहिशोबी मालमत्ता सापडल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वी कस्टम विभागाने विमानतळावरून सोने तस्करी करणाऱ्या व्यक्तींना अटक केली होती.

यातील काही आरोपींनी जप्त करण्यात आलेले सोने नाशिकमधील व्यापाऱ्यांना विकल्याची कबूली दिली होती. याबाबत ५ सराफा व्यवसायिकांची नावे समोर आली होती. आयकर विभागाने त्यांचा आयटी रिटर्नचा तपशील तपासला असता, उत्पन्नापेक्षा मिळकत अधिक असल्याचे दिसून आले. त्यामुळे या व्यापाऱ्यांवर धाडसत्र सुरू झाले.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा