घरपुणेPune Porsche Accident : विशाल बिल्डरच्या मुलावर आमदार पत्नीचे गंभीर आरोप; कारनामे...

Pune Porsche Accident : विशाल बिल्डरच्या मुलावर आमदार पत्नीचे गंभीर आरोप; कारनामे केले उघड

Pune Porsche Accident :

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात दारू पिऊन सुसाट गाडी चालवत एका अल्पवयीन मुलाने दोघांचा जीव घेतला. हिट अँड रनच्या या घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हादरला. अल्पवयीन मुलाच्या हातात वडिलांनी कार दिलीच कशी, अनेकांनी उपस्थित केला. धनदांडग्या कुटुंबातील या अल्पवयीन मुलाला कुणाचाही धाक नसल्याचं समोर आलं आहे.

अल्पवयीन मुलाचे अनेक कारनामे देखील उघड झाले आहेत. पैशांची उधळपट्टी करणं, अलिशान जीवन जगणं, मोठमोठ्या बारवर जाऊन मित्रांसोबत दारू पार्टी करणं, अशा अनेक गोष्टी हा मुलगा करत होता. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नीने अल्पवयीन आरोपीचा भांडाफोड केला आहे.

सोनाली तनपुरे यांनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून पोस्ट करत बिल्डर विशाल अग्रवाल याच्या मुलाचे अनेक कारनामे उघड केले आहेत. अग्रवाल यांचा मुलगा शाळेत माझ्या मुलाला विनाकारण त्रास होता. यासंदर्भात मी त्याची तक्रार अग्रवाल यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी याकडे लक्ष दिले नाही.

अखेर माझ्या मुलाला शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा लागला, असा खुलासा सोनाली तनपुरे यांनी केला आहे. विशाल अग्रवाल यांनी वेळीच त्यांच्या मुलाकडे लक्ष दिले असते, तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असंही सोनाली तनपुरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हिट अँड रनच्या या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत अल्पवयीन मुलाच्या वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथून त्यांना अटकही करण्यात आली आहे. आज अग्रवाल यांच्यासह त्यांच्या अल्पवयीन मुलाला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा