घरमहाराष्ट्रBaba Vanga Prediction : बाबा वेंगा यांचं हवामानाबाबत भाकीत काय सांगतं? खरंच...

Baba Vanga Prediction : बाबा वेंगा यांचं हवामानाबाबत भाकीत काय सांगतं? खरंच उष्णतेमुळे येत्या काळात येईल मोठं संकट?

Baba Vanga Prediction : 

जगात असे अनेक भविष्यकार आहेत जे येणारा काळ कसा असेल यावर भविष्यवाणी करतात. यापैकीच एक नाव म्हणजे बाबा वेंगा (Baba Vanga). आजवर बाबा वेंगा यांनी विनाश, युद्ध, राजकीय अस्थिरता, आर्थिक संकट, महामारी या संदर्भात भाष्य केलं आहे.

नुकतंच त्यांनी हवामानाशी संबंधित भाष्य केलं आहे. वाढती उष्णता आणि त्यामुळे लोकांचा वाढता ताण, आजारपण याविषयी त्यांनी भाकित सांगितलंय.

हवामानाशी संबंधित बाबा वेंगांची भविष्यवाणी काय सांगते?

चालू वर्ष 2024 च्या संदर्भात भविष्यवाणी करताना बाबा वेंगा यांनी हवामानाशी संबंधित महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. बाबा वेंगा यांनी यावर्षी ग्लोबल वॉर्मिंगशी संबंधित इशारा दिला आहे. यांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी संपूर्ण जगाला हवामानाशी संबंधित अनेक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागेल असं सांगण्यात आलं आहे.

बाबा वेंगा यांच्या मते, यावर्षी अनेक नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे. जे जगाला विनाशाकडे नेऊ शकतात. एका अभ्यासानुसार, यावर्षी उष्णतेच्या लाटेत सर्वाधिक तापमान 40 वर्षांपूर्वी नोंदविलेल्या तापामानापेक्षा खूपच जास्त आहे.

जागतिक हवामान संघटनेने देखील 2024 हे विक्रमी उष्ण वर्ष म्हणून नोंदवले जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2024 मध्ये उन्हाळ्याचा प्रवाह अधिक असेल. प्रचंड उष्णतेच्या लाटांमुळे जनजीवन विस्कळीत होणार आहे असं ते म्हणाले.

याबरोबरच यंदा दुष्काळ आणि जंगलांना आग लागण्याच्या घटनांमध्येही वाढ होण्याची शक्यता बाबा वेंगा यांनी वर्तवली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, यंदाच्या उष्णतेच्या आणि वाढत्या तापमानाचा शेतीवरही वाईट परिणाम होणार आहे असंही सांगितलंय.

आर्थिक संकट येण्याची शक्यता

बाबांच्या मते, 2024 मध्ये संपूर्ण जग मोठ्या आर्थिक संकटातून जाणार आहे. जागतिक आर्थिक शक्तीतील बदल, भू-राजकीय तणाव आणि कर्जाची वाढती पातळी ही या आर्थिक संकटाची मुख्य कारणे ठरतील. विशेष गोष्ट म्हणजे सध्या जगातील मोठे आणि बलाढ्य देशही आर्थिक मंदीचा सामना करतायत.

कर्करोगावर लस येण्याची शक्यता

बाबा वेंगा यांचे एक भाकीत असं आहे की कर्करोग आणि अल्झायमरसारख्या अनेक असाध्य आजारांवर उपचार शोधण्यात या वर्षी तज्ज्ञांना यश येईल. अलीकडेच अनेक शास्त्रज्ञांनी कर्करोगावर लस शोधण्याचा दावा केला आहे. बाबा वेंगांच्या भाकितानुसार 2024 हे वर्ष वैद्यकीय प्रगतीचं वर्ष ठरणार आहे.

कोण आहेत बाबा वेंगा? ( Baba Vanga Prediction )

बाबा वेंगा यांची ‘बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस’ अशी ओळख आहे. 3 ऑक्टोबर 1911 रोजी बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांची वयाच्या बाराव्या वर्षी एका रहस्यमय वादळात दृष्टी गेली. यानंतर त्यांनी जगातील विविध देश, सामाजिक-आर्थिक आणि जागतिक घडामोडीबाबत अनेक भाकितं केली, जी नंतर खरी ठरली. त्यांनी 9/11 चा दहशतवादी हल्ला, ब्रेक्झिट यासह अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, ज्या पुढे खऱ्या ठरल्या.

टीप : बल्गेरियातील बाबा वेंगा यांची भविष्यवाणी दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होते. वरील सर्व बाबी Sanvaddrushti News केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून Sanvaddrushti News कोणताही दावा करत नाही. या भविष्यवाणीचं Sanvaddrushti News समर्थन करत नाही.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा