घरमहाराष्ट्रMaharashtra News : राज्यात पाणीबाणीनंतर आता चारा टंचाईचे संकट; फक्त दोन महिने...

Maharashtra News : राज्यात पाणीबाणीनंतर आता चारा टंचाईचे संकट; फक्त दोन महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध

Maharashtra News :

नाशिक : राज्यात सध्या पाणीटंचाईचं (Water Shortage Issue) भीषण संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत चारा टंचाई (Fodder Shortage) निर्माण होईल, अशी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्यात (Maharashtra News) सध्या 2 महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध असून चारा डेपो सुरू करण्याची शासनाची तयारी असल्याचं दुग्ध आणि पशु संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Dairy and Animal Husbandry Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितलं आहे.

दुग्ध आणि पशु संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) बोलताना म्हणाले की, “येणाऱ्या काळात चाऱ्याची टंचाई निर्माण होईल हा विचार करूनच आपण ऍडव्हान्स प्लॅनिंग केलं आहे. आज राज्यभरात दोन महिने पुरेल इतका चारा उपलब्ध. जर चारा डेपो सुरु करावे लागले तर चारा उपलब्ध करून देण्याची शासनाची तयारी आहे. चारा उत्पादनासाठी आपण शेतकऱ्यांना चांगला भाव देतो. त्यामुळे यंदा उत्पन्न चांगलं. जिथे पाण्याची उपलब्धता चांगली आहे. तिथल्या शेतकऱ्यांना आपण बियाणे मोफत देतो, चारा उत्पादन करण्यासाठी चारा छावाण्या सुरु करण्याची सध्या गरज नाही. तसेच, चारा आयात करण्याचीही गरज नाही, असं मत दुग्ध आणि पशु संवर्धन मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. पाऊस कमी झाला की, धरणं कमी भरतात. त्यामुळे आता पश्चिम वहिनी नद्याचं पाणी गोदावरी खोऱ्यात आणायची योजना आपण हाती घेतली आहे, अशीही माहीती विखे पाटील यांनी दिली आहे.

नगरमध्ये 5 दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी

नगर जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई असून नागरिकांवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात पाच-सहा दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या टँकर्सवर अवलंबून राहावे लागत आहे. नगरमध्ये सर्वाधिक 99 पिण्याचे टँकर हे पाथर्डी तालुक्यात सुरु करण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील 291 गावांत आणि 1544 वाड्या वास्त्यावरील 5 लाख 70 हजार लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा