IAS – कोणत्याही परिस्थितीसोबत सामना करायला घरच्यांचा पाठिंबा असेल तर स्वप्न लगेच साकार होतात. असेच काजलला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लग्नानंतर पूर्ण पाठिंबा मिळाला. काजल जावला ही हरियाणाची रहिवासी आहे. त्यांचे शालेय शिक्षण हरियाणातून झाले.
शाळेनंतर तिने इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला.काजलने इंजिनिअरिंग केल्यानंतर तिला विप्रोमध्ये नोकरी मिळाली.ती विप्रोमध्ये वर्षाला तेवीस लाख कमावत होती. अनेकांसाठी हे स्वप्नवत काम असतं पण काजलला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं होतं. पतीने काजलचे स्वप्न समजून घेतले आणि तिला पूर्ण पाठिंबा दिला. काजलने यूपीएससीची तयारी सुरू केली.लग्नानंतर एका महिलेला घराची जबाबदारी कशी पेलायची हे टेन्शन असतं. तसेच तिला देखील होते. पण तिच्या नवऱ्याने सगळ्या मदत केली.
आधी झालेल्या चूकांवर लक्ष दिले. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव केला. त्यामुळे २०१८ मध्ये, काजलने तिच्या पाचव्या प्रयत्नात २८ व्या क्रमांकाने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि ती IAS अधिकारी बनली.