घरजालनाLok Sabha Election 2024 : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अंतरवालीत मराठा समाजाची बैठक सुरू;...

Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अंतरवालीत मराठा समाजाची बैठक सुरू; वसंत मोरेंनीही लावली हजेरी

Lok Sabha Election 2024 :

लोकसभा निवडणूक व उमेदवारी या बाबत मराठा समाज बांधवाची बैठक मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मार्गदशनाखाली शनिवार (ता. 30) रोजी अंतरवाली सराटी येथे सकाळ पासुन सुरु झाली आहे. या ठिकाणी राज्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत.

या बैठकीत राज्यातील 36 लोकसभा मतदासंघाचे अहवाल मनोज जरांगे यांना मिळाले असून त्याचे वाचण व अभ्यास मनोज जरांगे करत आहेत. पुणे लोकसभा निवडणूककरिता वसंत मोरे व सहकारी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले असुन ते मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. वसंत मोरे हे जरांगे यांना पुणे लोकसभा मधुन आपल्याला उमेदवारी द्यावी करीता भेट घेणार आहे जरांगे यांच्या सोबत भेटल्यावर ते या बाबत माहिती देणार आहे.

आजच्या या बैठकीत निवडणूक लढवणे , उमेदवार ऊभे करणे, पुढील दिशा ठरवणे करीता चर्चा करण्यात येत आहे मराठा नेते ,माजी आमदार, कार्यकर्ते येथे दाखल झाले आहे. जरांगे यांनी सांगितल्या प्रमाणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जे इच्छुक आहे असे कार्यकर्ते आप आपल्या गावातील झालेल्या चर्चेचा अहवाल या ठिकाणी घेऊन आले आहेत.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा