घरराजकारणSpecial Report : राज्यात बोगस मतदान ?, बोगस मतदानाचे व्हिडीओ व्हायरल; व्हिडीओमागचं...

Special Report : राज्यात बोगस मतदान ?, बोगस मतदानाचे व्हिडीओ व्हायरल; व्हिडीओमागचं सत्य काय?

Special Report :

राज्यातली लोकसभेची निवडणूक संपली असली तरी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी थांबलेल्या नाहीत, आता बोगस मतदानावरून राज्याचं राजकारण तापलंय. सोशल मीडियात बोगस मतदानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतायेत. या व्हिडीओंवरून उलट सुलट चर्चा सुरूंय. काय आहे या व्हिडीओमागचं सत्य, पाहूयात हा रिपोर्ट

राज्यातल्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपलीय. मात्र आता बोगस मतदानावरून राजकारण तापलंय. दर दिवशी सोशल मीडियात बोगस मतदानाचे व्हिडीओ व्हायरल होतायेत. हे व्हिडीओ तुम्हीही तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहिले असतील. कुणी बीडमध्ये बोगस मतदान झाल्याचा दावा करतंय. कुणी नगरमध्ये गैरप्रकार केल्याचं सांगतंय.

बोगस मतदानाच्या या व्हिडीओवरून केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर सोशल मीडियातही खळबळ उडालीय. या व्हिडीओवरून काही राजकीय नेत्यांनी तर थेट निवडणूक आयोगाकडे फेरमतदानाची मागणी केलीय. खरच निवडणूक अधिकाऱ्यांना धमकावून असं बोगस मतदान झालंय का? मतदानावेळी असे गैरप्रकार घडले आहेत का? असे अनेक सवाल मतदारांमधून उपस्थित केले जातायेत. लोकसभेसारख्या अत्यंत महत्वाच्या निवडणुकीशी संबंधित हा विषय असल्यानं साम टीव्हीनं यामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. आम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून माहिती घेतली तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा.

सोशल मीडियात व्हायरल होत असलेले व्हिडीओ 2024च्या लोकसभा निवडणुकीतले नाहीत. हे व्हिडीओ जुने असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलंय. निवडणूक आयोगानं काय स्पष्टीकरण दिलंय पाहा. काही व्यक्ती EVMमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न करत असतानाचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. इतर राज्यातील हे जुने व्हिडीओ असून ते व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंचा 2024 मधील मतदान प्रक्रियेशी संबंध नाही. राज्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली आहे

व्हायरल व्हिडीओ जुने आणि दिशाभूल करणारे असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलंय. त्यामुळे राज्यात बोगस मतदान झाल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. त्यामुळे अशा व्हिडीओंवर विश्वास ठेऊ नका.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा