घरमहाराष्ट्रAkola News : जिवे मारण्याची धमकी देत तरुणीवर तब्बल ३ महिने अत्याचार;...

Akola News : जिवे मारण्याची धमकी देत तरुणीवर तब्बल ३ महिने अत्याचार; तक्रार करूनही १३ दिवसांपासून आरोपी मोकाट

Akola News :

अकोला जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार प्रकार समोर आलाय. 21 वर्षीय तरुणीवर दोघांनी अत्याचार केलाय. जिवे मारण्याची धमकी देत अकोला शहरातल्या वाशिम बायपास परिसरातल्या एका खोलीत तिच्यावर दोघांकडून अत्याचार करण्यात आला आहे. या गावातूनच तिला बळजबरीनं उचलून नेण्यात आलं होतं, असा आरोपही पीडिताने तक्रारीत केला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून आज 13 दिवस उलटून गेले, अद्यापही आरोपी मोकाटचं आहेत. पीडितेने पोलिस ठाण्यात पायऱ्या चढल्या, मात्र हाती केवळ निराशाच पडली आहे. अखेर तिने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर धाव घेतली आहे.

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून बार्शीटाकळी पोलिसांनी चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे अत्याचार करणाऱ्या आरोपींवर याच्याविरुद्ध 363, 376, 376(2)(N), 377, 323, 506 आणि 34 नूसार गुन्हे दाखल केले आहे.

नेमकं काय घडलं होतंय?

शौचालयाला जात असताना दोन तरुण तिथे आले आणि तिला जिवे मारण्याची धमकी देत सोबत घेऊन गेले. त्यानंतर अकोल्यातल्या वाशिम बायपास इथल्या एका खोलीमध्ये तिला आणून ठेवण्यात आलं. इथे तिच्यावर दोघांनीही चाकूच्या धाक दाखवून अत्याचार केले. कुटुंबासह तुला देखील जिवानं संपवून टाकू, अशी धमकी दोघांकडून सतत यायची. साधरण ही घटना 5 डिसेंबर 2023 रोजी घडली. त्यानंतर दोघांनी तिचे फोटो काढत तिला ब्लॅकमेल केलंय आणि वारंवार तिच्यावर अत्याचार करत राहिले. 26 मार्च 2024 रोजीपर्यत हा सर्व प्रकार सुरूच होता.

27 मार्च रोजी पीडीत तरुणीनं त्यांच्या तावडीतून सुटका करीत घर गाठलं. घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला. लागलीच तरुणीनं कुटुंबासह बार्शीटाकळी पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली. 27 मार्चला तक्रार करूनही पोलिसांकडून त्यांना समज देण्यात देण्यात आला नव्हता. त्यानंतर दोघेही पीडीत तरुणीच्या घरासमोर यायचे, आणि जिवे मारण्याची धमकी कुटुंबीयांना देत होते, म्हणून भीतिपोटी तरुणीनं तक्रार दिली नाही. अखेर 11 मे रोजी पीड़ित तरुणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोचली. विशेष म्हणजे अत्याचार करणाऱ्या तरुणांपैकी एकाला ती ओळखत होती. या प्रकरणात चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून यात एका महिलेचाही समावेश आहे.

पोलीस म्हणतात…..

सदर प्रकरणात पीडीत तरुणीच्या तक्रारीवरुन चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार, तपासादरम्यान जो कोणी दोषी सापडेल त्या सर्वांना अटक करण्यात येईल, असं बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी साम’शी बोलतांना म्हटलं आहे.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा