घरराजकारणAjit Pawar : शरद पवारांना भाजपसोबत जायचं नव्हतं, मग ६ बैठका का...

Ajit Pawar : शरद पवारांना भाजपसोबत जायचं नव्हतं, मग ६ बैठका का झाल्या? अजित पवारांचा सवाल

Ajit Pawar :

अजित पवार यांची आज पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, भाजप बरोबर जाण्याची चर्चा झाल्याचं शरद पवार आता मान्य करत आहेत. भाजपसोबत सहा मिटिंग झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. भाजपबरोबर जायचं नव्हतं तर मिटिंग का झाल्या, असा सवाल यावेळी त्यांनी (Ajit Pawar On Sharad Pawar) केला आहे.

पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याच्या विधानावर बोलताना अजित पवार म्हणाले की, कधी कधी संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते असे विधान करतात. मला वाटत नाही उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष कॅाग्रेस मध्ये विलीन करतील. शरद पवार यांना जे वाटतं तेच ते करत असल्याचं अजित पवार (Ajit Pawar News) म्हणाले आहेत. तसंच बारामतीतून सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, सातारची जागा आम्ही सोडली आहे. त्या बदल्यात आम्हाला राजसभेची जागा मिळणार (Pune Lok Sabha 2024) आहे. म्हणून आम्ही आमची हक्काची जागा सोडली आहे. राज्यसभेच्या या जागेवर आम्ही साताऱ्याचाच उमेदवार देणार आहे. साताऱ्याच्या माणसालाच राज्यसभेवर पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मतदानाची टक्केवारी घसरल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, विरोधी पक्षांचे बुथवर एजंट असतात. त्यांनी नेमकं काय केलं? त्यांच्याकडे कॅमेरे असतात, मग तरी आरोप का (Maharashtra Politics) करतात असा सवाल यावेळी त्यांनी विचारला आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रु नसतो, कोणी कायमचा मित्र नसतो. पक्ष सोडलेल्यांना नो एन्ट्री असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शरद पवारांचा पराभव करणे हेच आमचे उदिष्ट असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यांची चुक झाली हे मी मान्य करतो, असं अजित पवार म्हणाले आहेत.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा