घरपुणेनाट्य आणि सिनेसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्काराची बालगंधर्व कला अकादमी मानकरी

नाट्य आणि सिनेसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्काराची बालगंधर्व कला अकादमी मानकरी

पुणे – जागतिक रंगभूमी दिनाच्या पुर्वसंधेला आयोजित दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवार्ड २०२४ ने बालगंधर्व कला अकादमी परिवार सन्मानित…

“नाट्य आणि सिनेसृष्टीतील नवे पर्व, रंगभूमीलाही होई जिच्यावर गर्व, अशी एकमेव राष्ट्रीय कला अकादमी बालगंधर्व” अशीच सर्वत्र ख्याती असलेल्या नामांकित अशा बालगंधर्व कला अकादमी परिवार यांना हा पुरस्कार देण्यात आला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराजराजे भोसले, समाजसेविका भुमाता ब्रिगेडच्या तृप्तीताई देसाई, जेष्ठ अभिनेते रझा मुराद, श्री.दिपक शिर्के यांच्या हस्ते अकादमीचे मा. संचालक, किशोर कुमार यांना देण्यात आला. महाराष्ट्रातील सर्वोत्तम फिल्म ॲंड थिएटर आर्टस् अकादमी म्हणून शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय लावणी, गायन आणि नाट्याभिनयाचे सर्वोत्तम प्रशिक्षण देणारी तसेच देशातील सर्व स्तरातील कलावंतांना आपले कलागुण सादर करण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातील सर्वोच्च मानाचे आणि हक्काचे असे राष्ट्रीय व्यासपीठ आणि कलामंच उपलब्ध करुन दिल्याने सांस्कृतिक क्षेत्रातील अमुल्य योगदानासाठी हा पुरस्कार बालगंधर्व अकादमीचे संचालक, मा. किशोर कुमार यांना हा पुरस्कार देण्यात आला. रंगभूमी कलावंतासाठी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय उपक्रम कार्यक्रमांचे आयोजन अकादमीद्वारा दरवर्षी केल्या जाते. यामधे प्रामुख्यानें अकादमीवतीने आयोजित राष्ट्रीय बालगंधर्व कला महोत्सवाचे आयोजन भव्य स्वरुपाचे असते. सलग आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवात राज्याच्या कानाकोपऱ्यातून कलावंत सहभागी होतात आणि राज्यातीलच नव्हे तर संपुर्ण देशातून विविध राज्यांतील विविध भागांतून कलावंत बालगंधर्व अकादमी सारख्या प्रतिष्ठित नामवंत आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च सन्मान असलेल्या अशा राष्ट्रीय कला अकादमीच्या राष्ट्रीय मंचावर आपली कला सादर करण्यात आपले सौभाग्य समजतात आणि कलेचे सर्वोत्तम सादरीकरण करत उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांची मने जिंकतात. अकादमीने आणखी एका नव्या राष्ट्रीय मंचाची दारे कलावंतांसाठी उघडली आहेत, जिथे लवकरचं देशविदेशातील कलावंतापासूंन सर्वसामान्य कलोपासक कलावंतांना संधी देण्यात येईल असे अकादमीचे मा. संचालक, श्री. किशोर कुमार सर यांनी दिली. यासाठी कलावंतांना अकादमीच्या अधिकृत इंस्टाग्राम, फेसबुक अकाउंटवर प्रवेश अर्ज, नोंदणी फॉर्म उपलब्ध आहेत. नाट्य आणि सिनेसृष्टीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कार या सोहळ्याला नाट्य सिनेसृष्टीतील अनेक कलांतांची उपस्थिती लाभली.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा