घरमहाराष्ट्रLok Sabha Election Buldhana : काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह 25 जणांवर गुन्हा दाखल; काय...

Lok Sabha Election Buldhana : काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह 25 जणांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election Buldhana News :

राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू असतानाच काँग्रेससाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. बुलढाण्यात काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दाखल झालाय. जिल्हाध्यक्षांसह अन्य 25 जणांवर देखील गुन्हा दाखल झाला आहे. आचारसंहितेत आंदोलन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बँक खाते गोठवून त्यामधील रक्कम वळती करण्यात आली. सोबतच काँग्रेस पक्षाला 1800 कोटी रुपयांपेक्षाचा दंड आकारण्यात आला याचा निषेध करण्यासाठी काल बुलढाण्यात जयस्तंभ चौकात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली होती.

त्यामुळे बुलढाणा शहर पोलिसांनी याची दखल घेत आचारसंहिता काळात जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह 25 जणांवर कलम 188 व 135 नुसार गुन्हे दाखल केले आहे. यामुळे जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून २९ मार्च रोजी नवीन नोटीस बजावण्यात आली आहे. साल २०१७-२०१८ आणि २०२०-२०२१ या कालावधीतील दंड तसेच त्यावरील व्याज या संदर्भात ही नोटीस बजावण्यात आलीये. आयकर विभागाने काँग्रेसला १८०० कोटी रूपये रक्कमेचा दंड ठोठावला आहे. आयकर विभागाच्या नोटीसमुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.
जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा