घरसोलापूरMadha Lok Sabha Election 202 : 'माढा'त मराठा समाजातील 50 जणांनी ठाेकला...

Madha Lok Sabha Election 202 : ‘माढा’त मराठा समाजातील 50 जणांनी ठाेकला शड्डू; उमेदवार निवडीचे सर्वाधिकार मनाेज जरांगे पाटलांना

Madha Lok Sabha Constituency :

माढा लोकसभा मतदार संघातून मराठा उमेदवार देणार असून विजयाचा गुलाल आमचाच असणार असा निर्धार सकल मराठा समाजाने आज (गुरुवार) व्यक्त केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरविण्यासाठी आज माळशिरस सकल मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाने एक उमेदवार देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे (manoj jarange patil) यांच्या आदेशानुसार माळशिरस येथे मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयाेजिली हाेती. या बैठकीला तब्बल 3 हजार मराठा बांधव उपस्थित होते.

या बैठकीत सुमारे 50 जणांनी माढा मतदारसंघातून लढण्याची तयारी दर्शवली. दरम्यान यातून एकच सक्षम उमेदवाराची निवड मनाेज जरांगे पाटील हे करणार आहेत अशी माहिती धनंजय साखळकर (राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा) यांनी दिली. या उमेदवाराचा प्रचार आणि निवडून आणण्याची जबाबदारी सकल मराठा समाज घेणार असल्याचे बैठकीत सर्वांनी निश्चित केले.

मराठा समाजासह इतर समाजाची मते मिळतील कारण गाव गाड्यात सर्व जाती गुण्या गोविंदाने राहतात. त्यामुळे ते ही मराठा समाजाला मदत करतील. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, एसआयटी चौकशी असे समाजाचे मुद्दे घेऊन प्रचार करणार असल्याचे मराठा बांधवांनी सांगितले.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा