घरराजकारणMahadev Jankar News : ना माढा, ना बारामती.. महादेव जानकरांचा मतदारसंघ ठरला?...

Mahadev Jankar News : ना माढा, ना बारामती.. महादेव जानकरांचा मतदारसंघ ठरला? लवकरच होणार अधिकृत घोषणा

Mahadev Jankar News :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चढाओढ होताना दिसत आहे। महादेव जानकर यांचं नाव काही दिवसांपासून चर्चेत आहे। महादेव जानकर यांनी महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची काही दिवसांपूर्वीच भेट घेतली।

या भेटीनंतर महादेव जानकर महायुतीतून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालंय। मात्र मतदारसंघ कोणता हे अद्याप स्पष्ट होताना दिसत नाही। महादेव जानकर सोबत आल्यास त्यांना माढ्याची जागा सोडण्यास शरद पवार यांनी सहमती दर्शवली होती।

तर महायुतीत सामील झाल्यानंतर महादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढतील अशीही चर्चा सुरु होती। मात्र आता महादेव जानकर परभणीतून निवडणूक लढतील अशी चर्चा आहे। महादेव जानकर परभणी लोकसभा मतदारसंघातूनच रासपच्या चिन्हावरती महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढतील।

मित्र पक्षाला जागा दिल्यास पराभवाची भीती- बबनराव लोणीकर परभणी लोकसभेची जागा भाजपने कमळ या चिन्हावर लढल्यास दोन लाख मतांच्या फरकाने जिंकेल, असा दावा भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे।

मित्रपक्षाला ही जागा देण्याचा चुकीचा निर्णय झाल्यास, ही जागा हातातून जाण्याची भीती आमदार लोणीकर यांनी व्यक्त केली आहे।

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा