घरसोलापूरMadha LokSabha : मोठी बातमी : माढा मतदारसंघात प्रचाराचा नारळ फुटणार, एप्रिलच्या...

Madha LokSabha : मोठी बातमी : माढा मतदारसंघात प्रचाराचा नारळ फुटणार, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शुभारंभ

Madha LokSabha :

माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा नारळ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात फोडला जाणार आहे. या प्रचाराच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत माळशिरस येथून नारळ फोडून शुभारंभ केला जाणार आहे. महत्त्वाची माहिती खासदार रणजित निंबाळकर यांनी दिली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. या प्रचाराच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत माळशिरस येथून नारळ फोडून शुभारंभ केला जाणार आहे. महत्त्वाची माहिती खासदार रणजित निंबाळकर यांनी दिली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा नारळ फुटणार. माळशिरस हा मोहिते पाटील यांचा तालुका असून अजूनही मोहिते पाटील गटाकडून माघार घेण्याची कोणतीही चर्चा दिसत नाहीत. गेल्या चार दिवसापासून त्यांनी सुरु केलेला प्रचार थंडावल्याचे चित्र असले तरी, आजही कार्यकर्ते तुतारी हाती घेण्याबाबत आग्रही आहेत. असे असताना महायुती पश्चिम महाराष्ट्राचा प्रचाराचा नारळ थेट माळशिरस येथून फोडण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी महायुतीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत हे नीरानरसिंहपूर येथे असून प्रत्येक निवडणूकीपूर्वी ते आपल्या कुलदैवताचे दर्शन घेत असतात. यंदाही माळशिरस येथील प्रचाराचा नारळ फोडल्यावर फडणवीस हे कुलदैवताचे दर्शनाला जाणार आहेत. अजूनही महायुतीमधील अनेक जागांचा तिढा सुटला नसला तरी येत्या दोन दिवसात सर्व उमेदवार निश्चित केले जाणार आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयन महाराज हे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याचेही निश्चित झाल्याची माहिती खासदार रणजित निंबाळकर यांनी दिली आहे.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा