घरराजकारणShirur Lok Sabha: अजित पवारांनी डाव टाकला, अमोल कोल्हेंना शह देण्यासाठी मोठी...

Shirur Lok Sabha: अजित पवारांनी डाव टाकला, अमोल कोल्हेंना शह देण्यासाठी मोठी खेळी; शिरुरचे समीकरण बदलणार?

Shirur Lok Sabha Election 2024 :

लोकसभा निवडणूक जाहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी महायुतीकडून वेगवेगळे डावपेच आखले जात आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी अजित पवार मोठा डाव टाकला आहे. अमोल कोल्हे यांच्याविरोधात महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी मिळणार हे आता निश्चित झालं आहे. पण ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून ही निवडणूक लढवणार आहेत. मी येत्या २६ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून पराभवाचा बदला घेण्यासाठी शिरुरमधून लढवणार, असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. शिरुरमध्ये महायुतीचा उमेदवार कोण? याबाबत बरीच शोधाशोध झाली. मध्यंतरी नाना पाटेकर यांच्या नावाची देखील चर्चा झाली. मात्र, अमोल कोल्हे यांच्याविरोधात शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणूक लढवणार यावर एकमत झालं. आज, शनिवारी आढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघ हा २००८ मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर २००९ आणि २०१४ साली झालेल्या निवडणूकीत या मतदारसंघावर शिवसेनेनं आपला भगवा फडकवला. २००९ मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरुरमध्ये ४ लाख ८२ हजार ५६३ मतं मिळाली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांचा पराभव केला होता. २०१४ च्या निवडणूकीत मोदी लाट होती. शिवसेनेने यावेळी पुन्हा शिवसेनेनं शिवाजीराव आढळराव पाटील यांना तिकीट दिलं. म

िळालेल्या संधीचं सोनं करत त्यांनी राष्ट्रवादीचे देवदत्त निकम यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. एकेकाळी शिरुर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण २०१९ साली झालेल्या निवडणूकीत शरद पवार यांनी डाव टाकत अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली. अमोल कोल्हे त्यावेळी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे अत्यंत लोकप्रिय झाले होते. शरद पवार यांनी याच लोकप्रियतेवरुन अमोल कोल्हे यांना शिरुर लोकसभेची उमेदवारी दिली. कोल्हेंनी शरद पवार यांचा विश्वास सार्थ ठरवत आढळराव पाटील यांना तब्बल ५८,४८३ मतांनी पराभव केला. आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी त्यांच्याविरोधात आढळराव पाटील यांना उमेदवारी देऊन नवी खेळी केली आहे.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा