घरराजकारणMaharashtra Lok Sabha Election : ना शरद पवार गट, ना ठाकरे गट,...

Maharashtra Lok Sabha Election : ना शरद पवार गट, ना ठाकरे गट, ना काँग्रेस… लोकसभा निवडणुकीसाठी वसंत मोरेंचं ठरलं!

Maharashtra Lok Sabha Election :

मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांना पक्षातून बाहेर पडून आता १० दिवस उलटले आहे. या दरम्यान वसंत मोरे यांनी काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटले. वसंत मोरे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं ते वारंवार सांगत आहेत. त्यांच्या या निर्णयावर ते आजही ठाम आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून काँग्रेसचे विद्यामान आमदार रविंद्र धंगेकर रिंगणात उतरु शकतात. त्यामुळे वसंत मोरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणे कठीण आहे. मात्र वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, कुठल्या पक्षात जाण्यासाठी मी मनसे सोडलेली नाही. मी सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटलो आहे. त्यानंतर मी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.

भाजपने पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बोलताना पुण्यातील निवडणूक एकतर्फी होईल असा दावा, मोहोळ यांनी केला. या दाव्याचा देखील वसंत मोरे यांनी समाचार घेतला. वसंत मोरे जोपर्यंत आहे तोपर्यंत पुण्यातील निवडणूक एकतर्फी होणार नाही.

जाहिरात करण्या साठी संपर्क साधा किंवा इमेज वर क्लिक करा - 9226299212spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

लोकानी हे ही वाचले

जाहिरात

ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज बदल माहिती हावी असल्यास संपर्क - 9172872889spot_img

ताज्या बातम्या

जाहिरात करण्यासाठी इमेजवर क्लिक करा किंवा संपर्क साधा spot_img

लोकांचे मत

जाहिरात करा